Breaking News

माहिती अधिकार अंतर्गत प्रलंबित तक्रारींचा अहवाल द्या ः सी.ई.ओ.


बुलडाणा दि 06 - माहिती अधिकार कायदयाबाबत ज्या तक्रारी विभाग प्रमुखांकडे आल्यात त्यांचा अहवाल वरीष्ठ स्तरावर न पाठविल्यास त्या विभाग प्रमुखांवर कार्यवाही करण्यात येते त्याकरिता विभागप्रमुखांनी अहवाल त्वरीत पाठविण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी दिलेत. 
आज जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात समन्वय समितीची बेठक संपन्न झाली त्यावेळी त्या अध्यक्षपदावरुन बोलत होत्या, यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक श्‍वेता खेडेकर, निवासी उपजिल्हाकारी नरेंद्र टापरे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्कीन, सहाय्यक पुरवठा अधिकारी सुनिल शेळके, उपायुक्त अन्न व प्रशासन चव्हाण, मुख्याधिकारी संजिव ओहळ, तथा विभाग प्रमुख उपस्थित होते. 
 त्यांनी यावेळी  जिल्हा उद्येाग केंद्र, निरंतर शिक्षण अधिकारी, होमगार्ड समादेशक, जिल्हा कारागृह, कुष्टरोग, जिल्हा आरोग्य अधिकारी या विभागाचा आढावा घेवुन तो त्वरीत सादर करण्याचे निर्देश दिलेत.लोकसेवा  अधिनियम अंतर्गत माहिती अधिकारी कोण, प्रथम अपिलिय अधिकारी कोण, द्वितीय अधिकारी कोण, विहीत प्रपत्रात माहिती भरुन त्यांची प्रत जिल्हाधिकारी कार्यालकडे त्वरीत पाठवुन ती आपल्या कार्यालयाच्या दर्शनिय भागात लावण्यात यावी असे निर्देश यावेळी दिपा मुधोळ यांनी विभाग प्रमुखांना दिलेत. 
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांनी ध्वज दिन, विद्युत विभाग, वर्ग 3 व  वर्ग चार  कर्मचारी  यांच्या अनुषेशाची माहिती विभाग प्रमुखांकडुन घेवुन प्रलंबित अहवाल त्वरीत जिल्हाधिकारी यांना सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.