सेल्फीच्या नादात समुद्रात दोघे बुडाले, मुलीचा मृत्यू
मुंबई, 9 - मुंबईच्या बँन्डस्टॅन्डवर सेल्फी काढण्याच्या नादाने एका मुलाचा आणि एका मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे. बॅन्डस्टॅन्डच्या किनार्यावर सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. तरन्नुम, कस्तुरी, नाझिया या तीन मैत्रिणी समुद्र किनार्यावर सेल्फी काढत होत्या, त्यावेळी तोल जाऊन त्या समुद्रात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या रमेश नावाच्या तरूणाने प्राणांची बाजी लावत कस्तुरी आणि नाझियाला वाचवले.
दोघींना वाचविणार्या रमेशला मात्र, तरन्नुमला वाचवण्यात यश आले नाही. तरन्नुमचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर रमेशही पाण्यात बुडाला. तरन्नुमचा मृतदेह सा
पडला आहे. तर रमेशच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. बँडस्टॅन्डवर गेलेल्या तिघींनाही ओहटी असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. बर्याच आत जऊन त्या तेथे फोटो काढण्यात दंग होत्या. याचवेळी पाणी हळूहळू वाढू लागले. मात्र एका बेसावध क्षणी सेल्फी काढत असताना अचानक या मुलींचा पाय घसरला आणि त्या थेट समुद्रात बुडू लागल्या. तिन्ही जणी पाण्यात बुडत असताना रमेश नावाच्या एका तरूणाने जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी घेऊन दोन मुलींना वाचवले. दुर्दैवाने एक मुलगी पाण्यात बुडाली आणि तिला वाचवण्यासाठी गेलेला रमेशही पाण्यात बुडाला.