शाळेच्या आवारात व्यसन करणार्या शिक्षकांवर कारवाई : शिक्षणमंत्री
मुंबई, 8 - शाळेच्या आवारात तंबाखु, दारूचे व्यसन करणार्या शिक्षकांवर आता कार
वाई करणार असल्याचा इशारा, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे.
व्यसनी शिक्षकांना प्रमोशन, शिक्षक पुरस्कार तसेच शासनाकडून दिल्या जाणार्या सोयी सुविधा बंद करण्यात येतील, असे तावडेंनी म्हटले आहे. जे शिक्षक सांगूनही या नियमाचे पालन करणार नाही, त्यांना बडतर्फ केले जाईल, असेही तावडेंनी ठणकावून सांगितले. शिक्षकांनी शाळेच्या आवारात व्यसन करू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो. ते सुद्धा हळूहळू व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे शाळेच्या आवारात शिक्षकांनी व्यसन टाळावे, असे तावडेंनी म्हटले आहे. एखाद्याला लागलेले व्यसन सुटत नाही त्याला वेळ द्यायला हवा. मात्र व्यसन बंद करण्यासाठी सरकार अशी पावले उचलत असल्याचे तावडेंनी स्पष्ट केले.