विहिरीत उडी घेत मेडिकल कॉलेजमधील तीन विद्यार्थिनींची आत्महत्या
चेन्नई, 24 - तामिळनाडूच्या वेल्लपुरममधील एका खासगी मेडिकल कॉलेजमधील तीन विद्यार्थिनींनी
विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या केलेल्या ठिकाणाहून पोलिसांना एका सुसाइड नोटही मिळाली आहे.
यात या तिनही विद्यार्थिनींनी आत्महत्येसाठी कॉलेज आणि कॉलेजच्या अध्यक्षांना कारणीभूत ठरवले. दरम्यान, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक कऱण्यात आली नसून पोलिसांचा तपास सुरु आहे. विद्यार्थिनींच्या कुटुबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. तसेच पोस्टमार्टम विल्लुपुरममध्ये नव्हे तर चेन्नईत व्हावे अशीही मागणी केली.