Breaking News

माजी सरन्यायाधीश कपाडिया यांचे निधन


मुंबई, 5 - सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया (वय 68) यांचे मंगळवारी पहाटे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले.
कपाडिया यांना काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव अंधेरीतील कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. कपाडिया यांच्या पार्थिवावर आज दुपारी चारच्या सुमारास वाळकेश्‍वर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.