Breaking News

आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल


सोलापूर, 5 - सोलापुरात सिद्धेश्‍वर देवस्थानच्या यात्रेवरुन सुरु झालेला वादंग वाढण्याची चिन्हं आहेत. कारण काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रणिती शिंदेंसह महापौर सुशीला आबोटे, मंदीर समिती अध्यक्ष धर्मराज काढादी यांच्यासह 31 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सदर बाजार पोलीस चौकीत पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला.आपत्कालीन रस्त्यावर मंडपाचा खांब रोवण्यासाठी गेल्याने आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह महपौर सुशिला आबुटे यांच्यासह 31 जणांवर दाखल झाला गुन्हा. जमावबंदी आदेशासह विनापरवाना स्पीकर वापरणे, उपोषणाला बसणे या कारणास्तव कलम 135, 137 आणि 188 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.प्रशासनाने मनाई केली असतानाही मंदिर समितीतर्फे आपत्कालीन रस्त्यावर दुकाने थाटण्याचा कार्यक्रम काल झाला होता. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले होते.दरम्यान, सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंच्याविरोधात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे मैदानात उतरल्या आहेत. याशिवाय माजी आमदार नरसय्या आडम म्हणजेच आडाम मास्तर यांनीही जिल्हाधिकार्‍यांविरोधात मोर्चा काढला आहे.मागील काही दिवसापासून सोलापूरमध्ये सिद्धेश्‍वर देवस्थानच्या यात्रेवरुन वादंग सुरु आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आराखड्याला देवस्थान समितीचा विरोध आहे. त्यामुळेच तुकाराम मुंढेंच्या विरोधात सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनीही दंड थोपटले आहेत. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही तुकाराम मुंढेंना विरोध केला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आराखड्यानुसार आपत्कालीन मार्गावर स्टॉल उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र काल सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या रस्त्यावर मंडप उभारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.