Breaking News

महिन्याभराच्या मुलीला आईनेच चुलीत जाळले


अमरावती, 6 - घरात एक मुलगी असताना दुसरी मुलगी झाल्याने गौरखेडा कुंभी या गावातील महिलेने एक महिन्याच्या चिमुरडीला चुलीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईनेच पोटच्या मुलीला जाळून टाकल्याची खळबळजनक घटना अमरावतीमध्ये घडली आहे.
चिमुरडी रडत असताना रागाच्या भरात आई निकिता वाकोडे हिने निशाणीला घराच्या चुलीमध्ये टाकून जाळून टाकले, यामध्ये एका महिन्याची चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. चुलीत जाळल्यानंतर या मुलीचे प्रेत कुंभीनजीकच्या विच्छन नदीपात्राजवळ एका बॉक्समध्ये फेकण्यात आले. गावातील लोकांनी हे प्रेत पोलिसांच्या निदर्शनास आणू दिल्यानंतर शोधाशोध सुरु झाली. तूर्तास या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. गरीबीमुळे मुलीचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्‍न या महिलेला पडला होता. त्यामुळे या चिमुरडीची हत्या केल्याची कबुली तिने दिली.