Breaking News

संजय दत्त 27 फेब्रुवारीला कायमचा सुटणार?


मुंबई, 6 - मुंबईतील 1993 च्या साखळी स्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी जेलमध्ये असलेला आरोपी अभिनेता संजय दत्त बाहेर येण्याची तारीख जवळपास निश्‍चित झाली आहे. संजूबाबा 27 फेब्रुवारीला जेलमधून सुटण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.
जेलमधील चांगल्या वर्तणुकीमुळे संजय दत्त 107 दिवस म्हणजेच साडेतीन महिनेआधीच सुटणार आहे. संजय दत्तच्या उत्तम वर्तणुकीमुळे गृहमंत्रालयाने संजूबाबाला मुदतीआधी सोडण्यास हिरवा कंदील दाखवल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. संजय दत्त सध्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी संजय दत्तची उर्वरीत शिक्षा रद्द करण्याची परवानगी दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पाटील यांच्या कार्यालयाकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
1993 मधील बॉम्बस्फोटांच्यावेळी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची 16 मे 2013 ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला मे 2013 मध्ये 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यातली दीड वर्षांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती. सध्या तो येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.