Breaking News

’जाणता राजा’च्या प्रयोगावेळी बुरुज कोसळला, 3 कलाकार जखमी

मुंबई, 30 - मुंबईतील विलेपार्लेमध्ये जाणता राजा नाटकाचा प्रयोग सुरू असताना रंगमंचावरील काही भाग कोसळला. या दुर्घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समजते आहे. पार्ले टिळक शाळेच्या पटांगणावर जाणता राजाचा प्रयोग सुरु असतानाच ही दुर्घटना घडली.
बाबासाहेब पुरंदरे लिखीत जाणता राजाचा प्रयोग पार्ले टिळक शाळेच्या पटांगणात सुरु असताना रंगमंचावरील एका बाजूचा बुरुज अचानक कोसळला. तिथं उपस्थित असणार्‍या तीन कलाकारांना यामुळं दुखापत झाली असून त्यांच्यावर पार्ल्यातील बाबासाहेब गावडे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या नाटकामध्ये जवळपास 300 हून अधिक कलाकार काम करतात. या प्रयोगाच्या शेवटच्या टप्प्यात ही दुर्घटना घडली.