Breaking News

जिल्हा माथाडी कामगार संस्थेच्या चेअरमनदी बबन आजबे

 अहमदनगर । प्रतिनिधी । 25 - अहमदनगर जिल्हा माथडी कामगारांच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बबन आजबे व व्हा.चेअरमनपदी नारायण गिते यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. नुकतीच काही दिवसापुर्वी पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणुकही बिनविरोध झाल्यानंतर चेअरमन, व्हा.चेअरमन यांच्या निवडी सुद्धा बिनविरोध झाल्या. याबद्दल अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष शंकरराव घुले यांनी सर्व संचालक मंडळ, सभासद यांचे विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, 25 वर्षापासून माथडी कामगार पंतसंस्थेचे संचालक आम्ही बिनविरोधत पद्धतीने निवडुण आणत आहोत. यामध्ये आम्ही  सर्वांना संधी देत असतो. सर्वांच्या विचाराने पतसंस्थेचा कारभार हा पारदर्शी पद्धतीने सुर असून कामगार्‍यांच्या कल्याणासाठीच हि निवडणुक बिनविरोध करण्यात आली,असे त्यांनी सांगितले.
या नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सत्कार सहाय्यक कामगार आयुक्त युवराज पडियाल व निवडणुक  निर्णय अधिकारी हरिचंद्र कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  हमाल पंचायत अध्यक्ष शंकरराव घुले, उपाध्यक्ष  गोविंद सांगळे, जनरल सेक्रेटरी मधुकर केकाण, बाबा आरगडे, रिक्षा पंचायतीचे उपाध्यक्ष आजीम सय्यद,  सतिष शेळके, अनुरथ कदम, मोहन सापते, बाळासाहेब वडागळे, लक्ष्मीबाई कानडे, शेख  रज्जाक, शेख लाल, नवनाथ महानुर, दिगंबर पाडुंळे, सचिन ठुबे, सचिन कर्पे, जालिंदर नरवडे, दिगंबर सोनवणे, बाळासाहेब म्हसे, केरबा पोळ, आशाबाई रोकडे, रत्नाबाई आजबे, नवनाथ लोंढे, संजय महापुरे आदि उपस्थित होते. 
यावेळी चेअरमन व व्हा.चेअरमन यांनी बोलताना सांगितले कि, सर्व संचालक मंडळाला विश्‍वासत घेवुनच पतसंस्थेचे निर्णय घेतले जातील. तसेच यापुर्वीच्या संचालक मंडळाचे सुद्धा मार्गदर्शन घेवुन पतसंस्थेचा कारभार पारदर्शी ठेऊ असे सांगितले. 
सहाय्यक कामगार आयुक्त युवराज पडियाल म्हणाले कि, हि निवडणुक बिनविरोध झाल्याने कामगारांच्या पैशाची बचत झाली. तो पैशा कामगारांच्या कल्याणासाठी वापरुन  माथडी पतसंस्था विविध कल्याणकारी योजना राबवू शकते, तसेच हमाल पंचायतचे अध्यक्ष घुले यांच्या नेतृत्वाखाली हमाल पंचायत असो किंवा माथडी पतसंस्था असो अशा विविध ठिकाणी खर्‍या अर्थाने कामगारांना न्याय मिळतो, असे ते म्हणाले. तसेच यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी यांनीही आपले मनगोत व्यक्त केले. यावेळी निवडून आलेल्या सर्व संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव  संजय महापुरे यांनी केल. तर संचालक सचिन ठुबे यांनी आभार मानले.