Breaking News

येळंबघाट येथे अपघात एसटी बस ट्रकची समोरासमोर धडक -- दहा जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक


नेकनूर,दि.4 - अंबाजोगाईकडे निघालेल्या एसटी बसची व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एसटी बसमध्ये दहा जण जखमी झाले. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले ही घटना काल सकाळी सहा वाजता येळंबघाट जवळ घडली.
अंबाजोगाईहून औरंगाबादकडे निघालेली एसटी बस (क्र.एम.एच.20-डी.एल.2210) या गाडीला येळंबघाट जवळ ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये एसटी बसमधील शेख इब्राहिम इस्माईल (रा.बीड) कौशल्या विश्‍वनाथ चक्रे (रा. अंजनडोह), शेख असलम शेख मुसा (रा.दासखेड), भगवान सोळंके (रा.अंजनगाव), शेख ईरशाद उस्मान (रा.अंबाजोगाई), शंकर वसंत चव्हाण (रा.अंबाजोगाई), अनिल नागानाथ परदेशी (रा.अंबाजोगाई), विशाल सज्जनराव देशमुख (रा.मस्साजोग), व गणेश दत्तू भसवर (रा.येवता) या प्रवाशांना मार लागल्याने त्याना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.