Breaking News

सांस्कृतिक मुक्तीत स्त्री सहभाग


क्रांतिजोती सावित्रीमाई यांचा जयंती महोत्सव काल देशभरात साजरी होत असताना ज्या पुणे शहरात त्यांनी सामाजिक आणि  सांस्कृतिक गुलामीतून स्त्रीयांना व बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी शिक्षणाची संधी निर्माण करून दिली, त्याच पुण्यात काल संघ परिवाराने आपल्या प्रतिमित्वाची साक्ष देणारा कार्यक्रम घडवून आणला. नुकताच 1 जानेवारीला पेशवाईचा पराभव करणारा विजयस्तंभ दिवस साजरा केला गेला. पण या दोन्ही सोहळ्यांची प्रस्थापित संस्कृतीने दखल न घेता आणखी प्रतिगामित्व मिरवण्याचा सोहळा घडवून आणणे ही बाब त्यांना पुन्हा कोणती संस्कृती आणावयाची याची झलक प्रस्तुत केली. वास्तविक आज सत्ताबदल होवून लोकांच्या भौतिक जीवनात बदल घडवून आणला जाईल, असे आश्‍वासन दिले गेले होते. परंतु प्रत्यक्षात भाजपच्या हाती सत्ता आल्यावर आरएसएस ने आपली संस्कृती मजबूत करण्यासाठी दिवसेंदिवस प्रयत्नांची काष्ठा कली जात आहे. त्यामुळे आपणास या परिस्थितीचा अधिक गांभिर्याने विचार करावा लागेल. एका बाजूला महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी करायची आणि दुसर्‍या बाजूला त्यांनी जे ऐतिहासिक कार्य केले आहे त्याचे विस्मरण तर करायचेच पण त्याचप्रमाणे प्रतिगामित्वाच्या संस्कृतिचा पर्यायी कार्यक्रम घडवून आणावयाचा असा त्यांचा दुहेरी कार्यक्रम चालविला जात आहे. पण नेहमीप्रमाणेच आमचा बहुजन समाज हा दिशाभूल करण्यात येत आहे.पण ही दिशाभूल आमच्यावर सांस्कृतिक गुलामी अधिक कसली जात आहे. साविञीमाई फुले यांनी पुण्यात स्ञीयांसाठी  काढलेली शाळा केवळ मागास व दलित महिलांसाठीच शाळा काढली नव्हती; तर त्याशाळांचा उपयोग वरच्या जातीच्या महिलांनाही झाला.किंबहुना वरच्या जातीच्या स्त्रीयांनीच यागोष्टीचा जास्त फायदा घेतला. आज वरच्या स्थानी असलेल्या महिलांनी या स्थितीचा फायदा घेतला असला तरी त्यांनी या गोष्टींचे श्रेय सावित्रीमाईंना कधीही दिले नाही. याचा अर्थ त्या स्त्रिया वरच्या जातीच्या असल्या तरी मनाने ब्राह्मणी पुरूषी मानसिकतेच्या गुलाम आहेत, हे स्पष्ट होते. उच्च जातीय
स्त्रीयांची देखील सांस्कृतिक मुक्ती करण्याची जबाबदारी बहुजन समाजावर आहे.