Breaking News

पैशांच्या देवाणघेवाणीतून व्यापार्‍याची हत्या


औरंगाबाद, 21 - एका व्यापार्‍याने दुसर्‍या व्यापार्‍याची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर हत्येनंतर आरोपीने मृत व्यापार्‍याचे शीर धडावेगळे करुन नाल्यात फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. अनिल शर्मा असे मृत  व्यापार्‍याचे नाव आहे.
अनिल शर्मा हा एस. लॉजिस्टिकचा मालक होता तर आरोपी संतोष पाटील हा हॉटेल व्यावसायिक आहे. या दोघांमध्ये पैशांचा व्यवहारही झाला होता. याच देवाणघेवाणीतून दोघांचा वाद झाला आणि याच वादातून अनिल शर्माची हत्या झाली असावी. असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृताची ओळख पटू नये यासाठी हत्येनंतर अनिल शर्माचे शीर धडावेगळे करुन ते औरंगाबादमधील एमआयडीसीच्या वाळूज येथील एका नाल्यात फेकून देण्यात आले होते. मात्र, गुरुवार नाल्यामध्ये हे शीर आढळून आल्यानंतर या संपूर्ण घटनेचा खुलासा झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी
तात्काळ तपासाची चक्र फिरवित आरोपी संतोष पाटील याला अटक केली.