Breaking News

शिवशक्ती मंडळातर्फे गोसेवा संगीत कार्यक्रम

 नाशिक/प्रतिनिधी। 23 -  येथील शिवशक्ती मंडळातर्फे संक्रांती पर्वाचा मुहूर्त साधून गोसेवा संगीत कार्यक्रम तपोवनातील गोशाळेत साजरा करण्यात आला.
आजच्या बदलत्या आधुनिक समाजात आपण आपली जुनी मूळ संस्कृती, विचार विसरत चाललो असताना, शिवशक्ती मंडळातर्फे पंडित डॉ. विजय सेतपाल व पंडित सूरज सेतपाल यांच्या मार्गदर्शनात समाज प्रबोधनाच्या दृष्टीने संक्रांतीच्या दिवशी आपल्या दिवसातील काही वेळ गोसेवा करण्यात तसेच आपल्या भावी पिढीला आपल्या संस्कृतीची माहिती व ओळख होण्याच्या उद्देशाने व चांगली संस्कारक्षम पिढी निर्माण होण्याकरिता तपोवनातील गोशाळेत मकरसंक्रांत सण गायींना चारा, फळे देऊन साजरा करण्यात आला. 
सदर कार्यक्रमात गोसेवा, गोशाळा परिक्रमा व गायत्री हवन, संगीत आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन यापुढेही सण उत्सव याप्रमाणे गोसेवा व समाजोपयोगी कार्य करण्याच्या दृष्टीने साजरे करण्यात येतील, असा संकल्प शिवशक्ती मंडळातर्फे करण्यात आला.