Breaking News

हॉटेलवर कंटेनर उलटला; लाखोेंचे नुकसान


 अहमदनगर । प्रतिनिधी । 13 - नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल येथे सोमवारी पहाटे भरधाव वेगाने आलेला कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्यामुळे घडलेल्या अपघातात दोन हॉटेलचे मोठे नुकसान झाले. या घटनेत मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 
पांढरीपूल येथे रविवारी मध्यरात्री उसाने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला होता. ट्रकमधील संपूर्ण ऊस रस्त्यावर पडला होता. त्यामुळे पहाटे भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर सरळ रस्त्यालगतच्या हॉटेलमध्ये घुसले. 
अशोक बोरूडे, सुनील बनबेरू यांच्या हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पांढरीपूल येथे याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. भरधाव वेगाने ये-जा करणार्या वाहनांमुळे सध्या पांढरीपूल येथील सर्व व्यावसायिक जीव मुठीत धरून व्यवसाय करत असून, या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी महामार्ग विभागाने सूचनाफलक तसेच रात्रीचे रेड लॅम्प लावावेत, अशी मागणी सरपंच संजय वांजोळ, सोमनाथ हारेर, शिवाजी खंडागळे, बाळासाहेब काळे यांनी केली आहे.