Breaking News

रक्तस्त्रावाने होणारे माता मृत्यू रोखणारे संशोधन यशस्वी


। स्त्रीरोगतज्ञ डॉ.बन्सी शिंदे यांचा दावा । शिर्डी येथील स्त्रीरोगतज्ञांच्या परिषदेत डॉ.शिंदे संवाद साधणार
 अहमदनगर । प्रतिनिधी । 13 -   प्रसुतीमध्ये अति रक्तस्त्राव होवून माता मृत्यू होण्याचे प्रमाण देशात जास्त आहे. दरवर्षी देशात 30 हजार माता मृत्यू याच कारणाने होतात. यावर योग्य निदान करण्याची पध्दत स्त्री रोगतज्ञ डॉ.बन्सी शिंदे यांनी 5 हजार मातांवर केलेल्या संशोधनातून शोधली आहे, असा दावा डॉ.बन्सी शिंदे व डॉ.स्मिता शिंदे  त्यांनी पत्रकार परिषदेत  केला. 
अधिक माहिती देतांना, डॉ.स्मिता शिंदे म्हणाल्या,  या उपचार पध्दतीची माहिती वैद्यकीय क्षेत्राला होण्यासाठी शिर्डी येथे 12 व 14 फेब्रुवारीला होणार्‍या राज्यस्तरीय स्त्रीरोग परिषदेत डॉ. शिंदे विशेष मार्गदर्शन करणार आहे.शिंदे हॉस्पिटल व अंकुर टेस्टुबेबी सेंटरमध्ये गेल्या  12 वर्षापासून  संशोधन केले आहे. या संशोधनातून त्यांनी शोधलेल्या उपचार पध्दतीत प्रसुतीत अति रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण घटले असल्याचा दावा केला आहे. या उपचार पध्दतीत खर्चाची वाढ नाही, पण सुरक्षितता अधिक आहे. या संशोधन काळात शिंदे यांनी 5 हजार मातांची चाचणी केली अ्राहे. विशेष म्हणजे, या मातांना या काळात रक्त देण्याची आवश्यकता लागली नाही. गंभीर अशा शस्त्रक्रियेला देखील सामोरे जावे लागले नाही. या उपचारपध्दतीमुळे एकाही मातेचा मृत्यू झाला नाही, असे त्यांनी सांगितले.
 आता मृत्यूचा या प्रकारात अभ्यास करतांना  9 मुद्दे तपासले आहेत. इंजेक्शन, कॅल्शिअम, ग्लुकोनेट, योग्य प्रमाणात वापरणे हे  उपचारपध्दतीतील महत्वाचा भाग आहे. शरिरातील उर्जा व पाणी यावेळी माताने टिकून ठेवण्यावर आम्ही लक्ष देतो. याकाळात गर्भपिशवी अंकुचन पावल्याशिवाय वर न काढणे, अति महत्वाचे ठरते. श्‍वासोच्छावासावर मार्गदर्शन व अति क्वचित प्रसंगी जिवन वायुची माक्सद्वारे पुरवण्यावर भर असतो. या दहा ते पंधरा मिनीटाच्या काळात गर्भपिशवी हातात घट्ट पकडून ठेवल्यास त्याचा फायदा होतो. परिणामी रक्तस्त्राव कमी होवून माताचे प्राण वाचतात. या काळात औषधांची मात्रा योग्य अशी ठेवली जातेे. त्याचा परिणाम इतर घटकांवर होणार नाही, याची काळजी घेतली जातेे. प्रसुतीनंतर मातेची दर तीन तासाला वैद्यकिय तपासणी केली जातेे. या काळात नातेवाईकांची मातेशी प्रेमभुमिका अतिशय महत्वाची ठरते.
अंकुशमध्ये 9 मुद्यावर आधारित उपचार पध्दती वापण्यात येते. असे ही त्यांनी सांगितले. गेल्या 12 वर्षाच्या संशोधन काळात 5 हजार प्रसुतीपैकी एकाही मातेस रक्त भरण्याची गरज पडली नाही. अतिस्त्रावामुळे एकाही मातेला कुठल्याही शस्त्रक्रियेला तोंड द्यावे लागले नाही या उपचार पध्दतीतील बदल शास्त्रीय पुराव्यावर आधारित असल्याचे डॉ.शिंदे यांनी सांगितले. या उपचार पध्दतीची माहिती डॉक्टरांना होऊन त्याचा उपयोग अधिकाधिक रुग्णांना व्हावा यासाठी शिर्डी येथे परिषद होणार आहे. या पध्दतीचा डॉक्टरांनी जास्तीत - जास्त फायदा घ्यावा असे आवाहन डॉ.सौ. शिंदे यांनी केले आहे. 
परिसंवाद व चर्चासत्र शिर्डी येथील सेंट लॉरेल येथे होणार आहे. चर्चासत्राबद्दल ुुु.ओसी2016.ळप  या संकेतस्थळावर सविस्तर माहिती मिळणार आहे. जगात हे पहिले संशोधन नगरमध्येच करण्यात आले असून हे एक जिल्ह्याला मोठे भुषण आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाचे ठरणार आहे. असे ही त्यांनी सांगितले.