Breaking News

महिला मटक्याकडे वळल्या


सांगली ः दि. 9 - मटक्यावर पोलिसांचा वॉच असून आता महिलाही मटका खेळण्याकडे वळल्या आहेत. त्यांच खेळणं मेरी चूप, तेरी चूप, असल तरी त्या उघडपणे आपल्या मटकेवाल्या पतिराजाला मदत करण्यासाठी सरळ रस्त्यावर उतरल्या आहेत.
मटक्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यात मटका खेळणार्‍यांची आणि मटक्याच्या आकडेवारीची माहिती घेणार्‍यांची संख्या दिवसे-दिवस वाढू लागली आहे. ती मंडळी बाजारात मिळणार्‍या आकड्याच्या पेपरची खरेदी करतात. अपेक्षित नंबर लावून तो आपल्या बायकांकडे देतात. त्या बायका संबंधित मटका किंग एजंटाकडे नेवून देतात त्याने बोटालावल्या (चिठ्ठी) कागदावरच पोच दिलेली असते. ती चिठ्ठी ती महिला पतीकडे नेवून देते. त्यामुळे पोलिसांचा पुुरुष मंडळींवर असलेल्या वॉच ला काहीच अर्थ राहिलेला नाही.
मटका खेळण्याकडे एका पुरुषाबरोबरच त्याच कुटुंब उतरले आहे. महिलांचा पोलिसांना कसलीही शंका येत नाही. आता हा प्रकार राजरोसपणे चालू आहे. महिला संबंधित मटका बुकीकडे जातात-येतात त्याचा पोलिसांना थांगपत्ता लागत नाही. तसेच बुकी हल्ली संबंधित मटकेवाल्याच्या घरापर्यंत जातात. त्यांची शंका पोलिसांना येत नाही आणि पोलिसांचेच त्याकडे दुर्लक्ष असल्याने या बुकीला पकडण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.
मटक्यामुळे माणसाची काम करण्याची प्रवृत्ती कमी होत चालली आहे. नशिबावर भरवसा ठेवणारा हा खेळ असला तरी त्यावर सांगली शहरातून लाखो रुपये लावले जातात. ज्यांना मटका लागतो (बसतो), त्यातून मटक्यावर पुन्हा मोठी रक्कम तर लावली जातेच. पण कांही पैसे दारुकडे वळलेले दिसतात. मटकेवाल्यांकडे विचारणा करता, गेली 2-3 वर्षे मटका सांगलीतून 80 टक्के गायब होता. सध्या या काळ्या व्यवसायाला चांगली बरकत आली आहे. साध्या चिठ्ठीवर लोकांच्या विश्‍वास बसतो. ही विश्‍वासार्हता आहे म्हणूनच मटका टिकून आहे, वाढती आहे. मटक्यामुळे माणूस आळशी बनतेय हे मान्यच आहे. परंतु या व्यवसायात नोकरदार सुध्दा उतरले आहेत. कांही पोलिसही मटका खेळतात. हे सर्वश्रूत आहे. कांही शासकीय कार्यालयातूनच गोपनियता पाळून एकादा माणूस सर्वांच्या आकडे असलेल्या चिठ्ठ्या मटका एजंटापर्यंत पोहचवितात. ही वस्तुस्थिती सर्वांनाच चांगली माहित आहे. कामगार वर्गात प्रथमपासूनच मटका खेळण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याला कारण तुटपुंजा पगार. उपजिवेकेसाठी जेवढी रक्कम हवी तेवढी त्याला मिळत  नाही, त्याच्यापुढे घर संसार चालविण्याचे आव्हान असते. त्यामुळे तो या काळ्या धंद्याकडे वळतो.
काही मटकाकिंग स्पष्ट बोलतात की, या धंद्याला शासनाने मान्यता दिली तर यातून शासनाला मोठ्या  प्रमाणात कराचे उत्पन्न मिळू शकते. परंतु शासनाकडून मान्यता मिळत नाही. म्हणूनच या धंद्याकडे लोक मोठ्या प्रमाणात वळलेले दिसतात.