शिक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून केंद्रप्रमुख महिलेचा विनयभंग
अहमदनगर । प्रतिनिधी । 13 - शिक्षक बँकेतील काही शिक्षकांचा गोंधळ व निवडणुकीमधील आरोप व प्रत्यारोपाने जिल्ह्यातील शिक्षकांची प्रतिमा राज्यभर डागळली आहे. त्यातच आत्तापर्यंत अनेक शिक्षक दारु अड्डा व जुगार अड्ड्यावरील छाप्यात पकडले आहेत. असे असतांना राहुरी तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चक्क तपासणी अहवाल मी सांगेल तसाच दिला नाही म्हणून शिक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र प्रमुख महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या घटनेबरोबरच जिल्ह्यात तीन विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. या घटनेप्रकरणी तीन जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात रोज तीन ते चार विनयभंगाच्या घटनांची नोंद होत आहे. यात काही तांत्रिक घटनांचाही समावेश आहे. काळीमा फासणार्या घटनांसंदर्भात समजलेली माहिती अशी, नगर शहरात राहणारी एक महिला जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या शाळा अंतर्गत केंद्र प्रमुख म्हणुन काम करते. राहुरी येथील पंचायत समितीच्या शाळेत तपासणी करण्यासाठी केंद्र प्रमुख महिला गेली असता शिक्षक संघटनेचा मोठा कार्यकर्ता असल्याचे सांगून माझ्या शाळेतील अहवाल माझ्या प्रमाणेच देण्यात यावा. असे बाजवले. संबंधीत महिला केंद्रप्रमुखाने आढळून आला त्यानुसार अहवाल सादर केला. या अहवालाचा राग धरुन संजयकुमार दादा कुलकर्णी (राहुरी,शिक्षक) याने महिलेचा पदर ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन जीवे ठार मारण्याची दिल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी केंद्र प्रमुख महिलेने शिक्षण विभागाच्या वरीष्ठाकडे तक्रार केली. शिक्षक संघटनेचा मोठा कार्यकर्ता असल्याने वरीष्ठांनी दखल घेतली नाही. त्यामुळे संबंधीत शिक्षकाचे धाडस वाढले. व संबंधीत महिलेला त्रास देण्याच्या घटना वाढल्या. म्हणून 1 ऑक्टोंबर 2015 रोेजी असाच प्रकार राहुरी पंचायत समिती कार्यालयासमोर घडला. याचे सविस्तर निवेदन, माहिती शिक्षण विभागाला दिली.
कारवाई न झाल्याने संबंधीत पिडीत महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात सविस्तर तक्रार अर्ज दिल्याने पोलिसांनी आरोपी कुलकणी याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले की, केंद्र प्रमुख म्हणून काम करत असतांना 11 सप्टेंबर 2015 रोजी राहुरी येथील जिल्हा परिषद शाळा येथे तपासणीसाठी गेले असता कुलकर्णी यांनी मी सांगेल तशीच तपासणी करा, यास नकार दिल्याने 1 ऑक्टोबर 2015 रोजी सायंकाळी 4.25 च्या सुमारास पंचायत समिती कार्यालयासमोर पाठीमागून येऊन कुलकर्णी यांनी साडीचा पदर ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तु माझ्याकडे चल, अन्यथा तुला व मुलाला जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली. कुलकर्णी हे संघटनेचे कार्यकर्ते असल्याने वरीष्ठांकडे तक्रार करुनही वरीष्ठांनी कारवाई केली नाही. कुलकर्णीला घाबरुन फिर्यादीने फिर्याद दिली नाही. मुलासोबत येऊन पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आल्याचे म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सफौ. डी.बी.जाधव करीत आहेत.
बेलवंडी परिसरातील निबवी येथील एका महिलेच्या घरात घुसून दोघांच्या मदतीने एकाने विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन सोनु वंसत धानगुडे, दत्ता धानगुडे, व लता धानगुडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी शहरातील मुसलवाडी ते टाकळीमियाँ रस्त्यावर अडवून अमोल दत्तु पवार व त्याच्या दोन मित्रांनी रस्त्यात अडवून एका 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनांमुळे पालकवर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.