Breaking News

आर.आर. हांडे यांचा गौप्यस्फोट;चौकशी क्रमप्राप्त --- सार्वजनिक बांधकाम : भुजबळ क्लिन चीट अहवाल सचिव पातळीवरचे षडयंत्र


मुंबई., 7 - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ क्लीन चीट अहवाल तयार करण्याचे षडयंत्र सचिव पातळीवर शिजले त्याचे खापर कार्यकारी अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांच्यामाथ्यावर फोडून त्यांनाच बळी देण्याचे कारस्थान राबविले जात असल्याचा गोप्य स्फोट नाशिक साबांचे कार्यकारी अभियंता आर.आर.हांडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे भुजबळ क्लीन चीट अहवाल आर.आर.हांडे यांनीच तयार केल्याची चर्चा सुरू असतांना हांडे यांचा गौप्यस्फोट महत्वाचा मानला जात आहे. हांडे यांच्या नव्या खुलाशामुळे साबांतील मतभेदांतून भयंकर रहस्य समोर येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतांना महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळ निर्दोष असल्याचा अहवाल साबांतून एसीबीला पाठविण्यात आला होता. साबांमंत्री चंद्रकांत पाटील यांना अनभिज्ञ ठेऊन हे कारस्थान झाल्यानंतर दोषी अभियंत्यांवर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. या अहवाल षडयंत्रात कार्यकारी अभियंता आर.आर.हांडे, अधिक्षक अभियंता 
अतुल चव्हाण आणि मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. इतकेच नव्हे तर प्रत्यक्षात आर.आर.हांडे यांनीच अहवाल तयार करून तो चव्हाण आणि देबडवार यांना सुपूर्द केल्याची चर्चा अधिक होती. आर.आर.हांडे यांच्यावरचा संशय अधिक गडद होत असतांना त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटवजा खुलाशाने क्लीन चीट अहवाल प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. आर.आर.हांडे यांनी हा क्लीन चीट अहवाल मुख्यअभियंता आणि सचिव पातळीवर तयार झाला असल्याचा खुलासा केला आहे. सचिव तामसेकर, अतिरिक्त मुख्यसचिव आनंद कुलकर्णी आणि मुख्यअभियंता उल्हास देबडवार हेच या अहवालाचे जन्मदाते आहेत. तामसेकर यांनीच कुलकर्णी आणि देबडवार यांच्या सहयोगाने हा अहवाल तयार केल्याची पुष्टीही हांडे यांनी जोडली आहे. आर.आर.हांडे यांच्या या खुलाशामुळे साबांत कुठल्या पातळीवर कुठल्या प्रकराचे षडयंत्र रचले जाते यावरही प्रकाशझोत पडला आहे. तामसेकर, कुलकर्णी, देबडवार यांनी केलेल्या दुष्कृत्याची सजा स्वतः कार्यकारी अभियंता आर.आर.हांडे व अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना देऊन बळी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आर.आर.हांडे यांचा आरोपही गंभीर आहे. आर.आर.हांडे यांनी केलेला हा गौप्यस्फोट खरा की खोटा याची शहनिशा होणे आवश्यक आहे. हांडे म्हणतात त्याप्रमाणे खरोखर मुख्यअभियंता आणि सचिव पातळीवर अशा प्रकारचे षडयंत्र असेल तर साबांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. जबाबदार उच्चस्तरीय अधिकार्‍यांकडून अशा प्रकारचे षडयंत्र करणे अपेक्षित नाही. म्हणून त्यांची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक ठरते. आणि अहवाल प्रकरणातील संशयित कार्यकारी अभियंता आर.आर.हांडे हे आपली मान सोडविण्यासाठी खोटा आरोप करीत असतील तर त्यांचीही चौकशी होणे तितकेच आवश्यक ठरते.
लोकमंथनच्या वृत्ताची येतेय प्रचिती
श्यामल मुखर्जींचे पितळ अखेर उघड
 सार्वजनिक बांधकाम खात्यात झालेल्या नोकरभरती प्रक्रियेत प्रचंड घोळ होऊन शेकडो उमेदवारांची फसवणुक झाल्याचा दावा लोकमंथनने काही महिन्यांपूर्वीच केला होता. त्याच वृत्ताची प्रचिती आज येत असून श्यामल मुखर्जी यांच्या कार्यकाळात 120 उमेदवारांची नोकरभरतीत फसवणुक झाल्याचे उघड होते आहे. 

यासंदर्भात सविस्तर वृत्तांत उद्याच्या अंकात 
सखाराम तामसेकरांचा प्रताप, अप्पर पोलीस आयुक्तांचा ठपका
सखाराम भगवान तामसेकर, हरिष श्रवण पाटील, लक्ष्मण वामन देशपांडे, सार्वजनिक बांधकाम खात्यातील या तीन भामट्यांनी 11 नोव्हेंबर 2008 यादिवशी टेंडर इच्छूक कंपन्यांच्या आर्थिक निकषात फेरफार करून त्यांना टेंडर मिळण्याची व्यवस्था केली ही बाब मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त किशोर जाधव यांनी एका पत्राद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. दि. 10.7.2015 या दिवशी अप्पर पोलीस आयुक्त किशोर जाधव यांनी शासनाला म्हणजे पायाभूत सुविधा समिती आणि सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, 11.11.2008 रोजी तामसेकर, पाटील आणि देशपांडे यांनी आर्थिक निकषांत फेरफार करून अपात्र कंपन्यांना कामे देण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यामुळे शासनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. असा ठपका या पत्रात ठेवण्यात आला आहे.