Breaking News

धोनीच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिशा पटानी!


मुंबई : मॉडेल दिशा पटानी टीम इंडियाचा एकदिवसीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्याच्या पूर्व प्रेयसीची भूमिका करणार असल्याचे वृत्त आहे. ही भूमिका कोण साकारणार याबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. मात्र आता दिशा ही भूमिका कऱणार असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी दिशाचे नाव टायगर श्रॉफच्या आगामी बागी या चित्रपटात मुख्य भूमिका करणार म्हणून चर्चेत होते. मात्र त्यानंतर या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली. नीरज पांडे दिग्दर्शित धोनी: अनटोल्ड स्टोरीमध्ये सुशांत सिंग राजपूत खुद्द महेंद्र सिंग धोनीची भूमिका बजावतो आहे.