Breaking News

अरबाझ-मलाईका होणार विभक्त ?

मुंबई : रणबीर कतरिनाचे ब्रेक अप आणि आता अरबाज-मलाईका हे आणखीन एक ’पॉवर कपल’ घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले समजते. पण, हा घटस्फोट का होतोय? मलाईका ब्रिटनच्या एका बिझनेसमनला डेट करतेय आणि त्यामुळे या दोघांत दुरावा वाढल्याचे सांगण्यात आले. 
याआधीही मलाईकाचे नाव अभिनेता अर्जुन कपूर याच्याशीही जोडण्यात येत होते. 42 वर्षीय मलाईका आणि 48 वर्षीय अरबाझ खान या जोडप्याला अरहान नावाचा एक मुलगा आहे. पण, सध्या या दोघांमध्ये दुरावा इतका वाढला की घटस्फोट हाच मार्ग दिसतोय. बातमीत केलेल्या उल्लेखानुसार, मलाईकाने काही महिन्यांपूर्वीच बांद्रास्थित आपले घर सोडले. आपल्या मुलांना घेऊन ती खारमध्ये असलेल्या एका नवीन अपार्टमेन्टमध्ये शिफ्ट झाली.