Breaking News

साईचरणी 2015 मध्ये तब्बल 270 कोटी दान

अहमदनगर, 30 - शिर्डीतील साईमंदिरात 2015 मध्ये साईंच्या गंगाजळीत तब्बल 270 कोटी रुपये दान पडले आहे. गेल्या वर्षांच्या 2014 च्या तुलनेत तब्बल 5 कोटी रुपयांनी दानाची वाढ झाली आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत साईंच्या दानपेटीत 270 कोटी रुपये जमा झाले असून, यात 8 कोटी रुपये परदेशी चलनांचा समावेश आहे.
तब्बल कोट्यवधी भक्तांनी शिर्डीतील साईंचे दर्शन घेतलं असून, यात 35 ते 40 देशातील भाविकांचा समावेश आहे. दरवर्षी शिर्डीत गर्दी आणि दानाचे  नवीन विक्रम असतात. साईबाबा संस्थानकडे आजमितीला 1 हजार 550 कोटींहून अधिक ठेवी, 390 किलो सोनं, 4 हजार 500 किलो चांदी आणि 7 कोटी 70 लाख रुपयांचे हिरे जमा झाले आहेत.