Breaking News

महावितरणच्या कर्मचार्‍यास मारहाण; गुन्हा दाखल

 अहमदनगर । प्रतिनिधी । 30 - थकबाकीदाराचे वीज कनेक्शन तोडल्याप्रकरणी महावितरणच्या कर्मचार्‍याला तेलीखुंट येथील कार्यालयात जाऊन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एकाविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरविंद शरद कोकडे या महावितरणच्या कर्मचार्‍याला मारहाण करण्यात आली आहे. अरविंद कोकडे यांनी थकबाकीदार नरसय्या बत्तीन हे थकीत वीज ग्राहक असल्याने त्यांचे वीज कनेक्शन तोडले. याचा राग आल्याने निलेश हंगेकर हे तेलीखुंट येथील कार्यालयात जाऊन तुम्ही बत्तीन यांचे वीज कनेक्शन का तोडले या कारणावरुन त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना हंगेकर यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करुन कोकडे यास मारहाण करण्यात आली. 
दरम्यान, मार्ज एण्डमुळे महावितरण कंपनीने थकीत वीज ग्राहकांविरोधात वसुली मोहिम सुरु केली आहे. मात्र, ही थकबाकी वसुल करताना त्यांनी एमआयडीसी येथील बड्या थकबाकीदारांकडेही लक्ष देऊन बड्या थकबाकीदारांची वीज थकबाकी वसुल केल्यास महावितरण कंपनीच्या महसुला वाढ होण्यास मदत होईल. तसेच छोट्या-छोट्या थकबाकीदारांकडील वसुली वरुन वादाचे प्रसंगही निर्माण होणार नाही. महावितरणच्या कम्चार्‍यास मारहाण केल्याप्रकरणी अरविंद कोकडे यांच्या फिर्यादीवरुन निलेश हंगेकर यांच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.