Breaking News

डीजेसमोर नाचताना तरुणाचा मृत्यू

अहमदनगर, 23 -  डीजेसमोर नाचताना पंकज खिलारी  या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
पंकज खिलारीच्या भावाची ढोकेश्‍वर महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याने गुरुवारी संध्याकाळी मिरवणूक काढली होती. मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सुरु होता. मोठ्या आवाजाने पंकजला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असले तरी त्याचा मृत्यू डीजेमुळेच झाल्याचं स्थानिक सांगत आहे
त.