छोट्या गोष्टीतून समाजाची प्रगती
सांगली ः दि. 5 - बहुजन समाजाने काळानुसार बदलायला शिकले पाहिजे. आजही काळाच्या 100 वर्षे मागे आहोत. अल्पसंख्यांक समाजही आपल्यापुढे गेला. प्रत्येकाने फार मोठेच काही केले पाहिजे, असे नाही, छोट्या-छोट्या गोष्टींतून बदल घडवता येतो. महिलांची भूमिका त्यात महत्वाची ठरेल, असे मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडतर्फे जिजाऊ-सावित्री दशरात्रोत्सवचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलिस प्रमुख सुनील फुलारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत धुमाळ, डॉ. जयश्री पाटील प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, सावित्रीबाईंमुळे महिलांना शिक्षक्षाची दारे खुली झाली. मात्र, इतक्या वर्षानंतरही जुन्या विचारसरणीला चिकटून आहोत. बदल स्वीकारलाच पाहिजे. समाज कारण नसताना जातीयवादात अडकला आहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष हेमलता देसाई यांनी प्रास्ताविक केले. अॅड. तेजस्विनी सूर्यवंशी, संजीवनी जाधव, शोभा पवार, वंदना गायकवाड, पूजा पाटील, उषा पाटील, सुप्रिया पाटील, विद्युलता मोरे, आशा पाटील, विद्या भोसले, शुभांगी साळुंखे यांनी संयोजन केले.मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील, विजयराव भोसले, चंद्रकांत पाटील, प्रतापसिंह पाटील, जे. के. महाडिक, सुयोग औंधकर, संजय पाटील उपस्थित होते.