Breaking News

दिल्लीत तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली, 30 - एनआयएने आयसिसचे अबुधाबी मॉड्यूल उघड केले. अबुधाबीहून दिल्लीत आलेल्या तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.
त्यात एका महाराष्ट्रीय युवकाचा समावेश आहे. आयसिसमध्ये तरूणांची भरती करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. महाराष्ट्रातल्या फरहान शेख या तरूणाचा यात समावेश आहे. तर शेख अझर उल इस्लाम हा तरूण जम्मू काश्मीरचा आहे. अदनान हसन नावाचा तरूण कर्नाटकचा आहे.