Breaking News

सातव्या वेतन आयोगासाठी लढा उभारावा लागेल


औरंगाबाद, 11 - समितीने केलेल्या शिफारसीप्रमाणे सातव्या वेतन आयोग लागू न झाल्यास टपाल कर्मचार्‍यांचा लढा उभारावा लागेल. त्यासाठी कामगारांनी एकजूट आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल 
भारतीय टपाल कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण चाळके यांनी केले. 
मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात रविवारी (ता.10) आयोजित अखिल भारतीय टपाल कर्मचारी 
संघटना वर्ग तीन पोस्टमन व वर्ग चार एमटीएस, ग्रामीण डाकसेवकांच्या विभागीय संयुक्त द्विवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन एस. बी. टाकळखेडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एस. टी. जाधव होते. प्रमुख पाहुणे उद्धव भवलकर म्हणाले की, देशात खासगीकरणाचे वारे जोरात असून त्याचे 40 टक्के प्रमाण भारतात आहे. आरक्षण आपण मागतो पण जागाच निर्माण होत नाही. लोकशाही समाजवाद समजून घेतला पाहिजे. यावेळी मंगेश परब, सुरेंद्र पालव, ए. पी. वग्गावाड, बाळकृष्ण चाळके, आर. पी. सारंग, देवेंद्र परदेशी, के. बी. मिसाळ यांनी कामगारांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोस्टमन, तसेच वर्ग चार एमटीएस व ग्रामीण खातेबाह्य डाकसेवकांची नवनिर्वाचित कार्यकारिणी निवडण्यात आली.