भाजपाध्यक्षपदी पुन्हा अमित शाह यांची निवड
नवी दिल्ली, 24 - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा अमित शाह यांची निवड झालेली आहे. शाह यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. शाह पुढील तीन वर्षांसाठी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील.
अमित शाह हे आधीचे भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांचा उर्वरित कार्यकाळ सध्या पूर्ण करत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी अध्यक्षपद सोडले होते. त्यामुळे पदाची जबाबदारी शाह यांच्या खांद्यावर देण्यात आली. त्यानंतर दिल्ली आणि बिहारमध्ये भाजपच्या पराभवानंतर अमित शाह यांच्या उचलबांगडीची चर्चा सुरु होती. मात्र तूर्तास शाह हेच भाजपच राष्ट्रीय अध्यक्ष राहणार असल्याचे म्हटले जात आहे.