Breaking News

25 बालकांचा शौर्य पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली, 24 - देशातील 25 बालकांना शौर्याबद्दल राष्ट्रीय बालवीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यापैकी दोन मुलांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये नागपुरच्या गौरव सहस्त्रबुद्धे या मुलाचा समावेश आहे. गौरवने पाण्यात बुडणार्‍या चार मुलांचा जीव वाचवला होता, मात्र त्यांना वाचवताना त्याला जीव गमवावा लागला.
गौरवशिवाय जळगाव जिल्ह्यातील कोथळीचा निलेश भील, वर्धा येथील वै
भव घांगरे, मुंबईतील वाळकेश्‍वरचा मोहित दळवी यांचा बाल शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. दरम्यान शौर्य सन्मान प्राप्त मुले प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये देखील सहभागी होणार आहेत. या पुरस्कारातील सर्वोच्च भारत पुरस्कार गौरव सहस्त्रबुद्धेला मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. नागपूरच्या हिंगणा रोडवरील टाकळी सीम भागात
असलेल्या अंबाझरी तलावात बुडणार्‍या 4 मुलांचे प्राण गौरवने वाचवले होते. यावेळी दहावीत शिकणार्‍या गौरवला आपले प्राण गमवावे लागले. बाणगंगा तलावात बुडणार्‍या कृष्णा पाष्टेचा जीव मोहित दळवीने वाचवला होता. दिव्याला राहणार्‍या कृष्णाने तिसरीची परिक्षा दिली होती. उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने ती मलबार हिलच्या बारकुंडनगर येथे राहणार्‍या आपल्या मामाकडे आली होती.