Breaking News

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ 56 टँकरद्वारे 45 गावे व 313 वाड्यांना पाणीपुरवठा

सांगली ः दि. 21 - जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ 56 टँकरद्वारे 45 गावे  व 313 वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. 
याबाबत श्री. गायकवाड म्हणाले, जिल्ह्यात सध्या 49 खाजगी व 7 शासकीय अशा एकूण 56 टँकरद्वारे 45 गावे व 313 वाड्या मधील 1 लाख, 23 हजार, 621 बाधित लोकसंङ्घयेला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 
यामध्ये जत तालुक्यात सर्वाधिक 49 टँकर सुरु असून कवठेमहांकाळ व खानापूर तालुक्यात प्रत्येकी 2 तर तासगाव तालुक्यात 3  टँकर सुरु आहेत. जत तालुक्यात 54, कवठेमहांकाळ 8, तासगाव 4 व खानापूर तालुक्यात 2 खाजगी विहीर/बोअर अधिगङ्घहण केल्या आहेत. तसेच जत तालुक्यात 3 खाजगी डिझेल इंजन अधिगङ्घहण करण्यात आले आहेत.