51 लक्ष 9 हजार 889 रूपयांचा जमिन महसूल माफ
बुलडाणा । 29 - जिल्ह्यात 2015 च्या खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील संपूर्ण 1420 गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांची अंतिम पिक पैसेवारी 50 पैसे व त्यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे. या गावांमध्ये शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेली आहे. दुष्काळग्रस्त गावांमध्ये शासनाने सवलती लागू केल्या असून 95 हजार 481 खातेदारांचा 51 लक्ष 9 हजार 889 रूपयांचा जमिन महसूल माफ करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 78 अन्वये जिल्ह्यातील 50 पैसे अथवा त्यापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांमध्ये जमिन महसूल माफ करण्यात आलेला आहे. या गावांमध्ये कृषि पंपांच्या चालू विज देयकात 33.5 टक्के इतकी सूट जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. आवश्यक तेथे पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सचा वापर करण्यात येणार आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकर्यांच्या कृषि पंपाची वीज जोडणी खंडीत न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागाने करावयाचा आहे.
खरीप हंगामातील पैसेवारी 50 पैसे अथवा त्यापेक्षा कमी आलेल्या गावांची संख्या, माफ करण्यात आलेल्या महसूलाची रक्कम व खातेदारांची संख्या पुढीलप्रमाणे : बुलडाणा 98 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 30 हजार 846 व खातेदारांची संख्या 4156 , चिखली 144 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 43 हजार 638 व खातेदार 5991, दे.राजा 64 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 7314 व खातेदार 536, मेहकर 161 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 35 हजार 373 व खातेदार 10 हजार 646, लोणार 91 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 7114 व खातेदार 617, सिंदखेड राजा 114 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 7646 व खातेदार 534, मलकापूर 73 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 65 हजार 899 व खातेदार 4079, मोताळा 120 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 46 हजार 123 व खातेदार 40124, नांदुरा 112 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 42680 व खातेदार 3619, खामगांव 145 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 55 हजार 270 व खातेदार 5521, शेगांव 74 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 70 हजार 26 व खातेदार 4007, जळगाव जामोद 119 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 49 हजार 98 व खातेदार 3534 आणि संग्रामपूर तालुक्यातील 105 गावांमध्ये माफ झालेली रक्कम 58 हजार 862 व खातेदार 12117 आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण 1420 गावांमध्ये 95 हजार 481 खातेदारांचा 51 लक्ष 9 हजार 889 जमिन महसूल माफ करण्यात आला आहे. या गावांमध्ये शासनाच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.