Breaking News

पाकिस्तानच्या दूतावासाजवळ बॉम्बस्फोट, 4 पोलिसांचा मृत्यू


मृत्यूकाबुल, 13 - अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावास परिसर आत्मघातकी हल्ल्याने हादरला. घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर भारत व इराणचा दूतावास आहे. स्फोटात चार पोलिस कर्मचार्यांना मृत्यू झाला आहे.
’टोलो न्यूज’नुसार, स्फोटानंतर परिसरात गोळीबार सुरु झाला आहे. याआधी चार जानेवारीला मजार-ए-शरीफमध्ये भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचे अफगाणच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्याने म्हटले होते. भारतीय दूतावासावर 4 जानेवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. अफजल गुरूला झालेल्या फाशीचा बदला घेण्यासाठी हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.