Breaking News

काळभोरनगर पोटनिवडणुकीत 37 टक्के मतदान


 पिंपरी (प्रतिनिधी) । 11 - प्रभाग क्रमांक 26 (अ) काळभोरनगर येथे पोटनिवडणुकीला आज (रविवारी) सकाळी साडेसातपासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली होती. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत सरासरी 6.6  एवढे मतदान झाले होते, त्यानंतर काळभोर निवडणुकीमध्ये एकुण 37 टक्के मतदान झाले आहे. त्यातही 6 हजार सातशे चाळीस मतदारांनी मतदान केले आहे.    
तर साडे अकरा वाजता ते 16 टक्के एवढे झाले ते वाढून दुपारी दीड वाजता 27.13 टक्के मतदान झाले होते. यामध्ये 18326 मतदारांपैकी 4972 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये पुरूषांचे प्रमाण 28 टक्के व स्त्रीयांचे 26 टक्के एवढे आहे. हे मतदान काळभोरनगर येथील सहा मतदान केंद्रांवर चालू आहे.
सकाळपासूनच उमेदवार व पक्षाचे कार्यकर्ते यांनी मतदान केंद्राच्या परिसरात गर्दी केली आहे. पोलिसांचा मतदान परिसरात पहारा असून  साडेनऊनंतर मतदारांचा ओघ वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अविनाश टेकवडे यांच्या हत्येनंतर रिक्त असलेल्या काळभोरनगर प्रभागातील नगरसेवक पदासाठी ही निवडणूक घेतलली जात असून, राष्ट्रवादीच्या उमेदवार सुजाता टेकवडे, भाजपाचे उमेदवार गणेश लंगोटे व शिवसेनेचे उमेदवार विजय गुप्ता या तिघांमध्ये ही तिरंगी लढत लढली जात आहे.