Breaking News

आमिर खानसह बॉलिवूडमधील 25 जणांची सुरक्षा काढली


मुंबई, 8 - बॉलिवुडमधील 40 सेलिब्रिटीजना असलेल्या सुरक्षा कवचेत मुंबई पोलिसांनी बदल केला आहे. यात सहिष्णूतेवर वक्तव्य देऊन वादात अडकलेल्या आमिर खान व शाहरुख खानचा समावेश आहे. तर 25 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. फक्त अमिताभ बच्चन, दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांची सुरक्षा आहे तशीच कायम ठेवण्यात आली आहे.
अमिर व शाहरूला सध्या एस्कॉर्ट व्हेईकल आणि चार आर्म्ड कॉन्स्टेबल मिळत होते. आता फक्त दोन आर्म्ड कॉन्स्टेबल मिळतील. शाहरुख आणि आमिर यांनी नोव्हेंबर महिन्यात इन्टॉलरन्सबाबत वक्तव्य दिले होते. शाहरुखने एका मुलाखतीत म्हटले होते की, ’देशात इन्टॉलरन्स वाढत चालला आहे. जर मला सांगितले गेले तर मी प्रतिकात्मक निषेध म्हणून मी मला मिळालेला पुरस्कार परत करेन. दुसरीकडे आमिरने एका कार्यक्रमात म्हटले होते की, ’देशातील वातावरण पाहता पत्नी किरणने धक्कादायक वक्तव्य केले होते.