Breaking News

डीएचएफएलच्या नफ्यात 16.4 टक्क्यांनी वाढ

 नाशिक/प्रतिनिधी। 29 - डीएचएफएल या खासगी क्षेत्रातील भारताच्या दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या गृहवित्त कंपनीने 31 डिसेंबर 2015 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत 17.54 टक्क्यांची वाढ मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत नोंदविली आहे. चालू वित्तीय वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत निव्वळ नफ्यात 16.43 टक्के वाढ 2014-15 या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत झाली आहे. 
अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) वार्षिक पातळीवर 23.48 टक्क्यांनी वाढले असून ते 31 डिसेंबर, 2014 च्या तुलनेत 52,637 कोटी रूपयांवरून वाढून 65,962 कोटी रूपयांवर गेले आहेत. ही कंपनी प्रत्येक भारतीयाला स्वतःचे घर स्वतःहून घेता यावे यासाठी आपल्या व्यापक अस्तित्व आणि उत्पादन नावीन्यपूर्णता यांच्या माध्यमातून सोयीच्या आणि परवडणार्‍या दरातील वित्तीय साध्यता देण्यासाठी तीन दशकांपासून लक्ष केंद्रीत ठेवत आहे. आम्ही 31 डिसेंबर 2015 रोजी संपलेल्या तिमाहीत ेक चांगली मागणी नोंदविली असून आम्ही आमचे सिद्द केलेले बिझनेस मॉडेल ज्यातून ग्राहकांना मूल्य आणि त्याचबरोबर परवडणारे दर व जागतिक दर्जाच्या सेवांची पूर्तता या गोष्टी देत आहोत. त्यामुळे आम्हाला सातत्याने अत्युच्च आणि तळाच्या पातळीवर वाढ मिळू लागली आहे - कपिल वाधवान (अध्यक्ष- व्यवस्थापकीय संचालक-डीएचएफएल)