Breaking News

एनआयए, एटीएसच्या संयुक्त कारवाईत मुंब्र्यातील म्होरक्यासह 13 जणांना अटक

मुंबई, 22 -  एनआयए, महाराष्ट्र एटीएस आणि हैदराबाद एटीएसच्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत 13 जणांना अटक केली असून आणखी एका संशयितला लवकरच अटक केली जाईल, असा दावा एनआयए आणि एटीएसने केला आहे.
अटक केलेल्या 13 जणांमध्ये बंगळुरुमधील चार, हैदराबादमधील चार, महाराष्ट्रातील दोन, मंगळुरुमधील एक आणि तुमकुरमधल्या एकाचा समावेश आहे. या मॉड्यूलचा प्रमुख मुद्दसर मुश्ताक शेखला मुंब्र्यातून अटक केली आहे. मुद्दसर मुस्ताक शेख हा सीरियामध्ये आयसिससाठी तरुणांची नेमणूक क
रणारा होता. देशात 26 जानेवारीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.