Breaking News

कनार्टक मुख्यमंत्र्याच्या पत्नीला एक लाखाची साडी


गलोर, 22 - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्नी पार्वती यांना चक्क वॉटर प्रूफ साडी भेट म्हणून 
दिली आहे. नारिंगी रंगाच्या या साडीची किंमत तब्बल एक लाख नऊ हजार रुपये आहे. 
महत्त्वाची बाब म्हणजे ही साडी खरंच वॉटर प्रूफ आहे की नाही हे पडताळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी साडी एक लिटर पाण्यात भिजवली. साडी वॉटरप्रूफ असल्याची खात्री पटल्यानतंरच त्यांनी ती एक लाख 9 हजार रुपयांना खरेदी केली. दरम्यान, सिद्धरामय्या यांनी साडी खरेदी केल्यानंतर बाजारात या साडीची मागणी वाढली आहे. कर्नाटक सिल्क इंडस्ट्रिज कॉर्पोरेशन आता या साडीची अ‍ॅडव्हान्स बुकिंग करत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी साडीवर एक लाख रुपये खर्च केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. एकीकडे कर्नाटकातील शेतकरी दुष्काळनिधीच्या प्रतिक्षेत आहेत, तर मुख्यमंत्री वॉटर प्रूफ साडीसाठी एक लाख रुपये खर्च करत आहेत. कर्नाटकात मागील दोन वर्षांपासून दुष्काळ आहे. केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदत जाहीर 
करुनही राज्य सरकार ती शेतकर्‍यांना देण्यास टाळाटाळ का करत आहे, असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.