Breaking News

नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी

लखनऊ, 22 - लखनऊमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात त्यांनी रोहित वेमुलाचा उल्लेख केला. त्याआधी पंतप्रधान भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांच्याविरोधात काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. ’नरेंद्र मोदी मुर्दाबाद’, ’मोदी गो बॅक’च्या विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. त्यांना बाहेर काढल्यानंतर मोदींनी भाषणाला सुरुवात केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वापस जाओ’च्या घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. गोंधळ घालणार्‍या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या मदतीने कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमात मोदींनी हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या घटनेचा उल्लेख केला. यावेळी पंतप्रधान मोदी काहीकाळ भावूक झाले होते.