Breaking News

बालसुधारगृहातून 12 मुलांचं पलायन


नाशिक, 11 -  गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 12 मुलांनी सोमवारी पहाटे पलायन केले. विशेष म्हणजे सबजेलचा दर्जा असलेल्या या बालसुधारगृहाची गजे कापून, 16 फूट भिंतीवरुन चढून हे 12 आरोपी पळून गेले आणि जेल प्रशासनाला थांगपत्ताही लागला नाही. जुन्या सीबीएससमोर आणि शहराच्या अगदी मध्यवस्तीत असलेल्या या सुधारगृहात किशोरवयीन गुन्हेगारांना ठेवले जाते. सबजेलचा दर्जा असल्यामुळे तिथली सुरक्षा जेलसारखीच कडेकोट असते. जेलला 16 फूट उंचीची भिंत बांधण्यात आली आहे. गुन्हेगारांना रात्री लॉकअपमध्ये ठेवले जाते.
इथेर रविवारी रात्री नेहमीप्रमाणेच सारे घडले. मात्र पहाटे काही लॉपअपचे गज कापल्याचे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. त्यानंतर शोधाशोध सुरु झाली आणि मुंबईतला 1, पुण्याचे 8, सातार्‍याचे 2 आणि इतर 1 असे एकूण 12 गुन्हेगार जेलमधून पळून गेल्याचे लक्षात आले. 16 फुटांची भिंत चढण्यासाठी या गुन्हेगारांनी चादरीं दोर केल्याचे उघड झाले. पलायन केलेले 12 जण 16 ते 18 वर्ष वयातले असून त्यांच्यावर खून, दरोडे, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी सरकारवाडा ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलिस
त्यांचा शोध घेत आहेत.