Breaking News

स्मिथच्या १३ कसोटीत ६ दमदार शतकांसह १४०४ धावा

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ याने यंदाचा आयसीसी ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ आणि ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार पटकवत कसोटी क्रिकेटमध्ये एक विक्रम रचला आहे. स्मिथ २०१५ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
स्मिथने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात नाबाद १३४ धावांची खेळी केली आहे. या खेळीसह स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये वर्षातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज झाला आहे.
स्मिथने इंग्लंडच्या अॅलिस्टर कुक याला मागे टाकून १३ कसोटी सामन्यातील २३ डावात ७०.२० च्या सरासरीने १४०४ धावा केल्या आहे. यामध्ये स्मिथने ६ शतके ठोकली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २०१५ वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कुक दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १४ कसोटी सामन्यातील २५ डावात १३५७ धावा ठोकल्या आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर १३१२ धावांसह इंग्लंडचा जो रुट आहे.

smith