Breaking News

जस्टीन लँगर तिरंगी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक

langer
सिडनी – माजी कसोटीपटू जस्टीन लँगर यांची २०१६मध्ये होणा-या वेस्ट इंडिजविरुद्ध तिरंगी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तिरंगी मालिकेसाठी लँगर यांची नियुक्ती विद्यमान प्रशिक्षक डॅरेन लेहमन सुट्टीवर जाणार असल्याने केली असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलियन संघ पुढील वर्षी जुनमध्ये वेस्ट इंडिज दौ-यावर जाणार असून या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. जस्टीन लँगर सध्या शेफील्ड शिल्ड स्पर्धेत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे तर बिग बॅश टी-20 लीगमध्ये पर्थ स्कॉचर्स संघाचे प्रशिक्षक आहेत. लँगर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद सांभाळतील. ‘माझ्यानंतर लँगरच ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक असतील. पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया मार्चमध्ये भारतामध्ये टी-20 विश्वचषक तसेच त्यानंतर श्रीलंका व भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. यामुळे आगामी काळाततरी प्रशिक्षकपद सोडणार नसल्याचे लेहमन यांनी सांगितले.

langer