Breaking News

टीम इंडिया एकदिवसीय क्रमवारीत दुस-या स्थानी कायम

दुबई – आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत टीम इंडियाने दुसरे स्थान कायम राखले असून विश्वजेता ऑस्ट्रेलियन संघ अव्वलस्थानी असून दक्षिण आफ्रिका तिस-या स्थानी आहे. मात्र एकदिवसीय क्रमवारीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान टॉप-१० मध्ये प्रवेश करताना दहाव्या स्थानी झेप घेतली आहे.
शुक्रवारी झालेल्या झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय लढतीत अफगाणिस्तानने ४९ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. याचाच त्यांना फायदा झाला असून त्यांनी एकदिवसीय क्रमवारीत दहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर दहाव्या स्थानी असणा-या झिम्बाब्वेची १२ व्या स्थानी घसरण झाली आहे. न्यूझीलंड चौथ्या स्थानी असून श्रीलंका पाचव्या स्थानी, इंग्लंड सहाव्या स्थानी तर बांगलादेश सातव्या, पाकिस्तान आठव्या स्थानी आहे. सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका न्यूझीलंडने ४-१ अशा फरकाने जिंकली तर त्यांना क्रमवारीत तिसऱया स्थानी येण्याची संधी आहे.

icic