Breaking News

हॉटेस्ट व्हेजिटेरियन ऑफ २०१५’ ठरले आमिर आणि अनुष्का


‘पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स’ (पेटा) ने यावर्षीचा ‘हॉटेस्ट व्हेजिटेरियन ऑफ २०१५’ या पुरस्काराने सुपरस्टार आमिर खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला सन्मानित केले आहे. या स्पर्धेत अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, कंगना रानावत, शाहिद कपूर, आर.माधवन आणि धनुष यांच्यासारख्या स्पर्धकांशी दोघांचा मुकाबला होता.
याबाबत बोलताना अनुष्काने सांगितले, तुम्ही काय खात असता हे खूप महत्वाचे असते. तुम्ही जे खात असता त्याप्रमाणेच तुम्ही असता. त्यामुळे भरपूर भाज्या खा आणि पाणी प्या. मीही हेच करते. ही स्पर्धा एका वेबसाईटवर पार पडली. यासाठी मतदान ही वेबसाईट वापरणाऱ्या लोकांनी केले होते.
एक व्हिडिओ पाहिल्यानंतर आमिरने पूर्णपणे शाहाकारी व्हेज होण्याचा निर्णय घेतला होता. त्याला हा व्हिडिओ त्याची पत्नी किरण रावने दाखवला होता. आरोग्यदायी भोजनशैलीवर आधारीत हा व्हिडिओ होता. याबाबत आमिर म्हणाला, व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की व्हेगन असणारे लोक मांसाहारी आणि शाकाहारीपेक्षाही आघाडीवर असतात. ते प्राण्यापासून बनलेल्या कोणत्याही वस्तुचा वापर वेगन करीत नाहीत. यामध्ये अंडी, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, मध, चमडे, फर, रेशीम, कॉस्मेटीक आणि प्राण्यांच्या उत्पादनापासून बनवलेले साबण या वस्तुंचा समावेश आहे. भारतातील पेटाचे व्यवस्थापक सचिन बांगेरा म्हणाले, आमिर आणि अनुष्का वनस्पतींपासून बनवलेल्या वस्तु वापरण्यास लाखो लोकांना प्रोत्साहित करीत आहेत.

aamir-khan