Breaking News

काजोलच्या मागण्यांनी फुटला अजयला घाम !

काजोल आणि अजय देवगण यांचा बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडीमध्ये समावेश होतो. त्यांच्यात पती पत्नी या नात्याने खूप प्रेम आहे. शेवटी किती झाले तरी अजय आहे नवरा असल्यामुळे त्याला बायकोची इच्छा मान्य करावीच लागते. पण त्याच्याकडे आता काजोलने जी मागणी केली आहे त्यामुळे त्याला घाम फुटण्याची वेळ आली आहे.
आपल्या अंगावर अजयने आपल्या नावाचे टॅटू काढावे असे तिला वाटते. अजयने यापूर्वी मुलगी नीसा आणि मुलगा युग यांच्या नावाचे टॅटू काढले आहेत. पण आता काजोललाही आपल्या नावाचा टॅटू त्याच्या अंगावर पाहायचा आहे. अजय देवगण सध्या आपल्या आगामी ‘शिवाय’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याच्याकडे टॅटू काढण्यासाठी वेळच नाही. अजयच्या छातीवर आपले नाव असावे असे काजोलला वाटते.

ajay-devgan