Breaking News

स्वप्नील-गौरीचे फ्रेंड्समधील ‘प्रेमिका..’ गाणे लाँच

friends
सिनेसृष्टीत अनेक प्रेमगीते गाजली आहेत, पण स्वप्नील जोशी आणि सचित पाटील यांच्या ‘फ्रेण्ड्स’ चित्रपटातील ‘प्रेमिका’ हे गाणं लाँच झाले असून या गाण्यात स्वप्नील आणि गौरी एका अनोख्या अंदाजात दिसत आहेत.
पुढच्या वर्षी २२जानेवारी रोजी दोन मित्रांची गोष्ट सांगणारा ‘फ्रेण्ड्स’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. स्वप्नील जोशी यात नीलची व्यक्तिरेखा साकारणार असून इमान जपणाऱ्या, तत्त्वनिष्ठ अशी नीलवर जेव्हा मैत्रीसाठी तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येते, तेव्हा तो काय भूमिका घेतो हे चित्रपटात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चित्रपटात अभिनेता सचित पाटील करण ही व्यक्तिरेखा साकारत असून जगाशी टक्कर घेणाऱ्या अँग्री यंग मॅनसमोर जेव्हा त्याचा जीवश्च मित्र उभा ठाकतो, तेव्हा करण काय करणार हे मोठ्या पडद्यावर उलगडले जाईल. आर. माधेश या दाक्षिणात्य दिग्दर्शकाचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून आर माधेश यांचा साऊथ इंडियन टच चित्रपटाला लाभल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

friends