Breaking News

चेन्नईतील विमान व रेल्वे सेवा पूर्वपदावर

chennai
चेन्नई- चेन्नईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्याने चेन्नईतील बंद असलेली विमान व रेल्वे सेवा रविवार सकाळी पुन्हा सुरू झाली आहे. चेन्नई विमानतळावरुन १५० प्रवाशांना घेऊन एअर इंडियाच्या विमानाने पोर्टब्लेअरसाठी उड्डाण केले. गेल्या काही दिवसांपासून चेन्नईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान, रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला होता.
पावसाचे पाणी साचल्याने एएआयने सहा डिसेंबरपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. विविध हवाई कंपन्यांची ३४ विमाने चेन्नई विमानतळावर होती. एअर इंडिया, जेट एअरवेज कंपन्यांनी विमाने उड्डाण घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चेन्नईमधून आता पावसाचे पाणी ओसरू लागल्याने हळूहळू रेल्वे सेवाही सुरू होत आहे. अनेक ठिकाणी खंडित झालेला विद्यूत पुरवठा सुरू झाला आहे.
तमिळनाडूतील पूरस्थिती आता सुधारत असून एनडीआरएफचे वेगाने मदतकार्य सुरू आहे. दलाच्या ५० तुकड्या आणि २०० नौका चेन्नईत असून आतापर्यंत १६ हजार नागरिकांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आले आहे