Breaking News

‘फ्रेण्ड्स’चे करण-नील प्रेक्षकांच्या भेटीला

friends
पुढच्या वर्षी २२ जानेवारीला दोन मित्रांची गोष्ट सांगणारा ‘फ्रेण्ड्स’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी आणि युथफूल हिरो सचित पाटील यात मुख्य भूमिकेत असून काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर आता दोन मित्रांची अनोखी कथा सांगणाऱ्या ‘फ्रेण्ड्स’ चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखांना प्रेक्षकांसमोर आणण्यात आले आहे. मराठी चित्रपटांमध्ये क्वचित दिसणारा या निमित्ताने कॅरेक्टर लाँचसारखा प्रकार पाहायला मिळत आहे. करण आणि नीलची भूमिका साकारणाऱ्या स्वप्नील जोशी आणि सचित पाटील यांचे स्वतंत्र पोस्टर्स लाँच करण्यात आले आहेत.