Breaking News

‘नांदूर शिकारी’त २५ वर्षांनंतर सत्तांतर


कुकाणा प्रतिनिधी :- नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी मंडळाचा दारुण पराभव झाला. दुर्गाअप्पा शेतकरी परिवर्तन मंडळाने १२ जागा जिंकून या संस्थेत तब्बल २५ वर्षानंतर सतांत्तर करत निर्विवाद बहुमत सिद्ध केले.

या सेवा संस्थेच्या संचालक पदाच्या निवडीसाठी रिंगणात २४ उमेदवार रिंगणात होते. शनिवारी झालेल्या निवडणुकीत २६५ पैकी २३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. यामध्ये २२७ मते वैध आणि ११ मते अवैध ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. व्ही. डमाळे व साहय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव प्रसाद गायकवाड यांनी काम पाहिले. या निवडणुकीत सर्जेराव कासारे, रावसाहेब खलाटे, संतोष खलाटे, शिवाजी मगर, ज्ञानदेव मुरकुटे, आसाराम लिपणे आदी विजयी झाले.