Breaking News

शहीदांच्या वारसांना नोकरी, पत्नींना एसटीमध्ये आजीवन मोफत प्रवास


शहीद जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देणाऱ्यातसेच त्यांच्या पत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करुन देणाऱ्या शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यातआली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातील सादरीकरण करुन या योजनेची घोषणाकेली. गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी तरुणांना एसटी महामंडळातनोकरी उपलब्ध करुन देणाऱ्या बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्पाचाही यावेळी शुभारंभ करण्यातआला. याशिवाय एसटी महामंडळाच्या इतर अनेक लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ एसटीच्यामुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात आज झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला.