Breaking News

उपवास आणि कुराण पठण परमेश्वराला आपलेसे करण्याचा मार्ग : काळे


कोपरगाव ता. प्रतिनिधी : आपली भारतीय संस्कृती संपूर्ण विश्वात महान आहे. सर्व धर्मांचा आदर करावा, अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्यामुळे आपल्या देशात अनेक जातीधर्माचे नागरिक गुण्या-गोविंदाने राहत आहेत. मुस्लीम बांधवही आपल्या धर्माची परंपरा शिकवण जोपासत आहेत. सर्व जातीधर्माचा आदर करतात. मुस्लीम बंधू-भगिनी आणि वयाने अतिशय लहान असलेली बालकेही पवित्र रमजान महिन्यात मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. विशेष नमाजमध्ये कुराण पठन करतात. अशा प्रकारचे खडतर उपवास व कुराण पठण हे परमेश्वराला आपलेसे करण्याचा उत्तम मार्ग आहे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. 

कोपरगाव येथे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सर्व मुस्लीम बांधव मोठ्या भक्तीभावाने उपवास करतात. उपवास प्रार्थना केल्यामुळे शरीर व मन पवित्र होते. रमजान महिना आनंद व प्रेरणा देणारा असून मुस्लीम बांधव एकत्र येवून करीत असलेली प्रार्थना व इफ्तार पार्टी सामाजिक ऐक्याचा संदेश देत आहे. 

यावेळी चिमुकलीने युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते रोजा {उपवास} सोडला. याप्रसंगी मौलाना मुख्तार, मौलाना यासीन मिल्ली, मौलाना निसार, मौलाना हाफिज बशीर रहेमान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव नगरसेवक संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, विरेन बोरावके, अजीज शेख, संदीप पगारे, सुनील शिलेदार, नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, दिनार कुदळे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक साळुंके, फकीर कुरेशी, रशीद शेख, इम्तियाज अत्तार, चांद पठाण, जावेद शेख, हारुण शेख, शफीक सय्यद, फिरोज पठान आदींसह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.